तामिळनाडु ची तामिळ
तामिळ लिपीचे दोन प्रकार पडतात
१. कोळएकुत्त
२. वट्टेकुत्त
तामिळ भाषा
तामिळ भाषा ही तामिळनाडू मध्ये
बोलली जाते. जसे मराठी भाषेचे अनेक उपप्रकार पडतांना दिसून येतात. त्याच प्रमाणे
तामिळ ह्या भाषेचे ही अनेक उपप्रकार पडतात. तामिळ भाषा ही द्राविडी भाषा
परिवारातील सर्वात अधिक विकसित आणि समृद्ध भाषा आहे. ही जगातील प्राचीन
मुलभूत भाषापैकी एक भाषा आहे. इ.स. पूर्व कित्येक शतकापासून या भाषेचे सुसंस्कृत
आणि सुव्यवस्था असे रूप आढळते. प्रचलित भारतीय भाषांत तामिळ ही एकच अशी भाषा आहे
कि जी संस्कृतच्या साह्य्यावाचून सर्व प्रकारच्या विचारांची समर्थअभिव्यक्ती करू
शकते. गेल्या काही शतकापासून तामिळ भाषेवर संस्कृतचा प्रभाव पडलेला असला तरी
अन्य द्राविडी भाष्यांच्या तुलनेत तो अत्यल्प आहे. थोड्या शब्दात जोरकस ऑर्थ
व्यक्त करण्याच्या बाबतीत तामिळ भाषेत हात धरणारी दुसरी भाषा क्वचित असेल असे मत
पसिव्हलने व्यक्त केले आहे.
तामिळ भाषा ही मद्रास पासून ते
कन्याकुमारी पर्येंत पसरलेला आहे. या शिवाय सिलोनच्या उत्तर भागातही या भाषिकांची
संख्या खूप मोठी असल्याचे दिसून येत आहे. तसेच ओडीसा, ब्रह्मदेश, मॉरीशियस बेटे
अन्य ब्रिटीश वसाहती यांमध्ये तामिळ भाषिक लहान मोठ्या संख्येयेने विखुरलेली आहेत. सध्या तामिळ भाषिकांची संख्या सुमारे तीन
कोटी असून त्यापैकी सुमारे सव्वा कोटी लोक सिलोन मध्ये राहत आहेत.
झरुल,कसुव ,कोरव, कैकाडी आणि
बरमंडी या तामिळच्या पाच बोलीभाषा आहेत. काही अल्प संख्यांक जमाती निलगिरी विभागात
आहेत. आणि उरलेल्या तीन बोलीभाषा काही भटक्या जाती जमातीत प्रचलित आहेत. शेनु (पूर्ण
अथवा साधू ) व कोंडून (ग्रामीण अथवा असाधू) अशी तामिळ प्रमाण भाषेची दोन रूपे आहे.
यांतील पहिले रूप साहित्याचे माध्यम असून दुस-या लोकांच्या नित्याची भाषा म्हणून वापरत आहे.
तामिळनाडू मध्ये तमिळ लिपीचे महत्व हि खूप आहे.
तामिळ लिपी
भाषेप्रमाणे तामिळ लिपीला हि तितकेच महत्व दिले जाते. तामिळ लिपी ही प्राचीन ब्राह्मी लिपीच्या एका विशिष्ट दाक्षिणात्य शैलीतील आहेत. तामिळ भाषेला स्वःताची अशी वैशिटय तमिळ लिपीला आहे.
भाषेप्रमाणे तामिळ लिपीला हि तितकेच महत्व दिले जाते. तामिळ लिपी ही प्राचीन ब्राह्मी लिपीच्या एका विशिष्ट दाक्षिणात्य शैलीतील आहेत. तामिळ भाषेला स्वःताची अशी वैशिटय तमिळ लिपीला आहे.
तामिळ लिपीचे दोन प्रकार पडतात
१. कोळएकुत्त
२. वट्टेकुत्त
कोळ म्हणजे काठी ज्या लिपीतील रेषा काठीसारख्या सरळ असतात. ती कोळ एकुत्त लिपी
होय. दुसरी वट्टेकुत्त लिपी गोलाकार वळणाची आहे.
वट्टेम्हणजे गोलाकार ही एक प्रकारची मोडी लिपी आहे.
तामिळ भाषा ही तमिळनाडू व पदुच्चेरी ह्या केंद्रशासित प्रदेशाची राज्यभाषा आहे. तसेच भारतातील पहिला अभिजात भाषेचा मान तामिळ भाषेला देण्यात आला आहे. ६.५ कोटीहून अधिक लोक ही भाषा वापरतात. तामिळ भाषेला २००४ मध्ये भारत सरकारद्वारे शास्त्रीय भाषेचा दर्जा प्राप्त झ़ाला आहे.

No comments:
Post a Comment